ALL >> Entertainment >> View Article
‘vithu Mauli’ Running For The Help Of Everyone
संसार क्लेशदग्धस्य’ संसाराचा याच प्रमाणे आपल्या सर्वांला अनुभव येत असतो. संसारातील क्लेशाचा अनुभव घेता घेता संसार सागर करावयाचा असतो. हे सर्व करीत असताना मन आणि शरीरावर दुःखाचे ओरखडे पडत असतात. हात-पाय थकतात, अस्वस्थता येते, पराजयाची किंवा अपयशाची भावना निर्माण होते, चिंता वाढत जाते, चेतना बधिर होते.
संसारातील क्लेशदग्ध किती असावेत? कधीतरी एखाद्याच्या नशिबात फक्त क्लेश भोगणंच लिहिलेलं आहे कि काय असं वाटण्या इतकं तो आयुष्यभर ...
... जगत असतो. बहिणाबाई चौधरी म्हणतात ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ‘ आपल्या संसारातील अनुभवातून सांगितलेले हे तत्वज्ञान इतके अचूक आहे कि या छोट्याश्या कवितेतून त्यांनी संसाराचा सार आपल्या पुढे मांडला आहे. परंतु एवढे सारे चटके सहन करीत मिळालेली भाकरीही पूर्णतः; करपलेलीच असावी इतकं फुटकं नशीब घेऊन काही जण आयुष्यभर जगत असतात. परंतु करपलेली भाकर हातात पडूनही त्या भाकरीचा आस्वाद घेत तृप्तेची ढेकर देणार्या अशा व्यक्तिमत्वाचे अभिनन्दनच करावेसे वाटते.
सामान्यत; बरेचजण आपल्याला किती कष्ट भोगावे लागत आहे, ‘आम्ही किती खस्ता खात आहोत, अगदी खुशालीतली व्यक्ती सुद्धा आम्ही किती अडचणीत आहोत, हे आमचे आम्हालाच माहित,’ वैगरे सारखी विधाने करुन आपल्या छोट्याश्या दुःखाचे पर्वताएवढे करण्याचं उगाच प्रयत्न करताना दिसतात. परंतु हे त्यांच्या दुःखाचे, क्लेशाचे मांडलेले प्रदर्शन बघून त्यानं विषयी वाईट वाटण्या पेक्षा त्यांची किव किंवा द्या येते.
आज आपण कितीतरी उदा बघत आहोत. आपल्या डोळ्यासमोर आपल्या कमावत्या तरुण मुलाचा किंवा पतीचा होणारा मृत्यू, आपल्या काळजाच्या तुकड्याचा दुडदुडू धावणाऱ्या पावलांचा अचानक आलेल्या अपंगत्वान थांबून जाणं, त्यामुळे आयुष्यभर बिछान्यावर पडून राहणे, नुकतंच सौभाग्याचं लेणं अंगावर लेऊन उंबरठ्यातलं माप ओलांडून प्रवेश करणाऱ्या, अंगावरील ओली हळदही सुकलेली नसताना क्षणात हरवून गेलेलं सौभाग्य माय -बापाला केवढं दुःख. कधी तर आपल्या पोटच्या गोळ्याला जन्म देऊन त्याला स्वताची ओळख देण्यापूर्वीच मातेला मरण यावे काय अवस्था असावी त्या मातेच्या घरच्याची, त्या अपत्याच्या नशिबास काय म्हणावे, कधी तर आपल्या कुकर्माला लपविण्यासाठी व स्वतःची ओळख लपविण्यासाठी ज्याला जगाची ओळख नाही त्या स्वतःच्या अपत्याला जगात एकटे सोडून देते, काय नशीब म्हणावे त्या बालकाचे. अशी कितीतरी देण्यासारखी उदा. आहेत देण्यासारखी.
कवियत्री बहिणाबाईच्या कवितेतून हेच समजून घ्यायचे कि ह्या संसारातील कुणाचे हात भाकरी करताना भाजतात, कुणाची भाकरी करपते, कुणाला कच्ची भाकरी खावी लागते, कधी तर भाकरी पूर्णतः बनवूनही खाण्यास मिळत नाही, बनलेली भाकरी सुद्धा नशीब होत नाही. असा हा संसार किती क्लेशदग्ध असावा आपन कल्पना करू शकाल? हि कल्पना करताना आपलं दुःख हे पर्वता एवढं वाढत? एवढ्या दुःखाचा अनुभव आपण घेतला असं कधीतरी आठवते ? आपल्या दुःखाची उंची मोजताना नक्की कोणतं माप आपल्या समोर आपण घेतलं असत ? आपल्या दुःखाची आणि इतरांच्या दुःखाची आपण किती मोजणी केली? हे दुःख भोगताना आपल्याला मिळत असलेल्या सहाय्य्यतेचा आणि इतरांच्या असाह्यतेचा आपण नक्कीच विचार केला का? नाही केला ना? तर मग करून बघाल तर आपलं दुःख कमी वाटायला लागेल आणि आपल्या मनावरील जी मळभ जमलेली असेल ती नक्कीच निघून जाईल.
अत्यन्त क्लेशदग्ध झालेले व्यक्तिमत्व आपले क्लेश विसरून जेव्हा चेहर्यावरील हास्य टिकवून इतर दुखी सोबत्यांना आपल्या मदतीचा, सांत्वनाचा हात देताना आपल्या हातांच्या त्या स्पर्शाने त्यांना व त्यांच्या हाताच्या स्पर्शाने आपल्याला कितीतरी सुख, आनन्द मिळतो हे बघा.
अश्या या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचे त्यांच्या हाताचे चुंबन घ्यावसं वाटतं, त्याच्या पायावर डोके ठेवावंसं वाटतं त्यांनाच म्हणावे कि….
Add Comment
Entertainment Articles
1. Why A Gaming Van Is The Perfect Birthday Treat For Your KidsAuthor: Saif
2. Optoma Best 4k Projectors In India Of 2025
Author: Optoma India
3. Pune Amusement Park
Author: PUNO Advance
4. Top Sites Providing Copyright-free Music
Author: Ganesh
5. Friday Night Funkin
Author: Alice
6. How To Monetize Youtube With Copyright-free Music
Author: Hoopr
7. Conference Planning Services: The Best Recourse To Execute An Event Smoothly
Author: Matimba Brilliance
8. The Ultimate Guide To Optoma Home Cinema Projectors
Author: Optoma India
9. Discover Exceptional Dance Opportunities At Loren James Dance Company
Author: Sophie Smith
10. Discover Top Mp3 And Mp4 Downloaders From Youtube
Author: y2mate
11. How To Earn Real Money By Playing Games: Your Ultimate Guide To Gaming Profits
Author: Arav
12. Elevate My Mind Fresh Uplifting New Single "lucky Thing" - A Global Celebration Of Fortune And Fun
Author: Media Manager
13. Optoma Best 4k Projector In India
Author: Optoma India
14. Make Your Event Extraordinary With A Top Singapore Magician
Author: Ryan Goh Magician
15. Bring Your Home Theatres To Life!
Author: Nano Theatre